मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup) पार पडत आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. तर या सामन्याआधी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी केली आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी सुरुवातीस चांगली भागीदारी रचना सुरुवात केली. मात्र तब्बल 15 गावांमध्ये सॅम करनने यांची भागीदारी तोडली. मोहम्मद रिजवान 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करू पाहणाऱ्या मोहम्मद हरीशला आदिल राशिदने 8 धावांवर आउट केले.
सामन्याच्या सुरुवातीला दोन विकेट गमावल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने शान मसूदच्या साथीने हा सामना सावरला. ही जोडी चांगला स्कोर करणार असे वाटायला लागल्यावरच राशीदने 28 चेंडूत 32 धावा करणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याची शिकार करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. तर दुसरीकडे बेन स्टोक्सने लगेचच इफ्तिकार अहमदला बाद केले. दरम्यान, तेराव्या शतकात 4 बाद आणि 86 धावा अशी पाकिस्तान संघाची अवस्था झाली.
4 बाद 86 धावा अशी पाकिस्तान संघाची अवस्था असताना शान मसुदने 28 चेंडूमध्ये 38 धावा करून पाकिस्तान संघाचा डाव थोडासा सावरला. मात्र सॅम करनने त्याला सतराव्या शतकात बाद करत पाकिस्तानला पाचवा जोरदार धक्का दिला.
पाकिस्तान संघ निम्मा पवेलियनला गेल्यानंतर सॅम करण आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एकापाठोपाठ एक आउट केले. या सामना दरम्यान सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या तर क्रिस जॉर्डन ने 2 विकेट आपल्या नावावर केल्या. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाला 20 षटकात 8 गडी बाद करत 137 धावांवर रोखले.
महत्वाच्या बातम्या
- T20 World Cup | lPL संदर्भात प्रश्न विचारतात बाबर आझम झाला अस्वस्थ
- Amol Kirtikar | वडीलांची घरी समजूत काढलेली का?, अमोल कीर्तीकर म्हणाले…
- Supriya Sule | “राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय…”; सुप्रिया सुळेंचा गजानन किर्तीकरांवर निशाणा
- Ajit Pawar | अखेर अजित पवार बोललेच! अब्दुल सत्तारांच्या सुळेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवार म्हणाले…
- Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्याला नोटीस, वाद पेटणार


