🕒 1 min read
Sushma Andhare | पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नेहमी शिंदे गटाला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिंदे गटाने मोठा डाव खेळला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar) यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही.” भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असं मत सुषमा अंधारे यांनी मांडलं.
पुढे त्या म्हणतात, त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं? कुठे जाऊ नये? हा त्यांचा प्रश्न आहे. तो विषय चर्चेचा होण्याचं कारण नाही. भविष्यात काय चित्रं असेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी कर्तव्य हे श्रेष्ठ असेल. मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या जाण्या-येण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं मी का मानावं? किंबहुना मी आता त्यांना माझा मित्र हितचिंतक मानत नसेल तर शत्रू का मानावं? असा सवाल करत हा मुद्दाच असू शकत नसल्याचं त्या म्हणाल्या.
वैजनाथ वाघमारे तुमच्याबाबत काही गौप्यस्फोट करणार आहेत. काय गौप्यस्फोट असेल? असं विचारताच त्या म्हणाल्या, त्यांच्याकडे काही असेल तर मला माहीत नाही. माझं आयुष्य मी स्वाभिमानाने जगते. महिला म्हणून आपण रडतखडत बसावं असं वाटत नाही. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे, असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kirtikar | वडीलांची घरी समजूत काढलेली का?, अमोल कीर्तीकर म्हणाले…
- Supriya Sule | “राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केल्याशिवाय…”; सुप्रिया सुळेंचा गजानन किर्तीकरांवर निशाणा
- Ajit Pawar | अखेर अजित पवार बोललेच! अब्दुल सत्तारांच्या सुळेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवार म्हणाले…
- Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्याला नोटीस, वाद पेटणार
- Sanjay Raut | “फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

