Share

आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. मागील आयपीएल हे कोरोना संसर्गामुळे युएईमध्ये झाले होते. मागील सत्रात आयपीएलचा अव्वल संघ समजला जाणारा संघ चेन्नई सुपर किंग्सची कामगीरी चांगली नव्हती झाली. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्लेऑफ फेरी गाठू शकला नाही. तसेच सर्वात पहिले स्पर्धेतुन बाहेर पडला होता.

महत्वाची बाब म्हणजे चेन्नईचा संघ गुणतालीकेत सर्वात खाली होता. यंदाचे आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. तसेच आयपीएलच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती चेन्नईच्या संघाच्या पुनरागमनाची. मागील सत्रात लौकीकाला साजेशी कामगिरी न करताही चेन्नईच्या संघाची आणि कर्णधार धोनीची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही.

दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्जला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षाअखेर होणारा टी-20 वर्ल्ड कप व अॅशेज सिरीच खेळायची असल्याने हेजलवूडने आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे.

क्रिकेटबोर्डाच्या वेबसाई़टला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ‘गेल्या दहा महिन्यांपासून मी बायोबबल व वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईनमध्ये आहे. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. पुढे हिवाळ्यात आम्हाला बरंच खेळायचं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. नंतर बांगलादेश, टी-20 वर्ल्ड कप, अॅशेज पुढील 12 महिने खूप बिझी असतील. त्यामुळे मी स्वत:ला मानसिक व शारीरिक रित्या सुदृढ करण्यासाठी हा ब्रेक घेत आहे. त्यामुळेच मी आयपीएलच्या या सत्रातून माघार घेतली आहे’, असे हेजलवूडने ,सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!