Share

जेंव्हा न्यायमूर्ती घुगे संवेदनशील आठवणीचे बांध मोकळे करतात !

Published On: 

नांदेड : सोळा तालुक्यांमध्ये विभागल्या गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचा भूमिपूजन समारंभ आभासी माध्यमातून पार पडला. यात मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमुर्ती रविंद्र विठ्ठलराव घुगे हे कोरोनाच्या नियमांमुळे औरंगाबाद येथूनच व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. काही दशकांपूर्वी माझे वडिल विठ्ठलराव घुगे हे यशवंत महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करीत होते, असे सांगून न्या. रविंद्र घुगे यांनी नांदेड जिल्ह्याची नाळ अधिक घट्ट केली. त्यांनी त्यांच्या वडिलांचे आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात व मराठवाड्याच्या विविध विकास कामात योगदान देणाऱ्या तत्कालीन मान्यवरांचा उल्लेख करतांना स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व त्यांचा असलेला स्नेह या आठवणीला उजाळा दिला. आठवणींच्या या उजाळ्यात त्यांनी त्यांच्या आईची एक आठवण सांगून न्यायदान आणि न्यायमंदिराप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली.

भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामासह नांदेड येथे संपूर्ण ८० एकर जागेत सर्वच सुविधा एकत्र असलेले न्यायालय संकुल लवकर व्हावे यासाठी मी पालकमंत्री म्हणून अधिक उत्सूक असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याच्या भूमिपूजनास पालक न्यायमंत्री म्हणून घुगे साहेबांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य न्यायमूर्ती यांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखविली. भोकर येथील नवीन बांधल्या जाणाऱ्या न्यायालयीन इमारतीत ज्या काही अद्ययावत सुविधा अपेक्षित आहेत त्याचे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश यांनी करावे. न्यायालयाच्यादृष्टिने ज्या काही सेवा-सुविधा अत्यावश्यक आहेत त्या सर्व सेवा-सुविधा आम्ही उपलब्ध करुन देऊ असेही यांनी स्पष्ट केले.

भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीराम रा. जगताप, भोकर येथील जिल्हा न्यायाधीश-१ मुजिब एस शेख, आमदार अमर राजूरकर,अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड बळवंत डी. कुलकर्णी हे प्रत्यक्ष सहभागी होते. जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी यावेळी समयोचित भाषण करुन जुन्या प्रकरणांचा त्वरित निपटारा व्हावा यासाठी न्यायदानाच्या प्रक्रियेत भोकर येथील अभियोक्ता संघ पुढाकार घेईल, अशी अशा व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!