मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. २०१८ ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी काढलेल्या अध्यादेशावर सही न करण्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं. जो डेटा आहे ती कोणाच्या घरची संपत्ती नाही. तो दिला पाहिजे. तो डेटा ठेऊन काय पुजायचा आहे का? असं भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय हा संपूर्ण देशाला लागू आहे म्हणून तुम्ही मोदी यांना भेटा. तुमचं नेतृत्व मान्य करायला आम्ही तयार आहोत, असं मी त्यांना म्हणालो, असं भुजबळांनी सांगितलं.
‘तत्कालीन फडणवीस सरकारने इंपिरिकल डाटा (वस्तुनिष्ठ माहिती) न देता सदोष अध्यादेश काढणे, न्यायालयात चुकीचे शपथपत्र सादर करणे, यातूनच ओबीसी आरक्षणावर आज पाणी सोडावे लागले आहे’, अशी टीका भुजबळ यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांबद्दल निर्णय घेतलाय, लवकरच बातमी कळेल’, राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
- ‘या’ मित्रांमुळेच मी तुरुंगात होतो; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट!
- इलेक्ट्रॉनिक दुचाकी मोदी सरकारच्या निर्णयामुळे स्वस्त
- …अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल; फडणवीसांची घोषणा
- कॉंग्रेसने स्वबळाची भाषा केल्यानंतर राष्ट्रवादीनेही सुरु केली जोरदार मोर्चेबांधणी


