नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध शिवसेना आमदार सुहास कांदे असा वाद अजूनही सुरूच असल्याचं समोर येत आहे. कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. ‘छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप कांदे यांनी केला. दरम्यान, भुजबळ यांनी आता कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
कांदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच भुजबळ यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. माझ्याकडून वादाला पूर्णविराम देत असल्याचं म्हणत वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भुजबळ कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, असं विधानही त्यांनी केलं आहे. पुढे त्यांनी कांदे यांच्या आरोपावर देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
‘या वर्षी फक्त नियोजन निधीअंतर्गत केवळ 10 टक्केच रक्कम आली आहे. तसेच हा निधी फक्त कोरोनासाठी वापरण्याचे आदेश आहेत. बाकी पैसे आले की अडचणी दूर करू. माझ्याकडे निधी मागण्यासाठी कोणीही आलं तरी, जिल्हाधिकारी यांनी उचित कारवाई करावी असा रिमार्क असतो,’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
यासोबतच, कांदे यांनी भुजबळ यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हटवावे अशी मागणी केली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ‘मी निधी वाटतो हा सुहार कांदे यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला मालामाल; ‘टाटा’च्या 2 शेअरमुळे महिनाभरात कमावले 900 कोटी
- लस आहे पण सुई नाही; पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी खासदार इम्तियाज जलील यांचे ‘मिशन तालीम’
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


