पुणे : देशातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालं नसलं तरी कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने मात्र गती घेतल्याचे दिसून येत असतानाच पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध आहे, पण ती टोचणार कशी ? असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे. लसीचा डोस देण्यासाठी आवश्यक सिरींजचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे कालपासून पहायला मिळत आहे.
जानेवारी महीन्यात देशांत लसीकरण सुरु झाले.दुसर्या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता. त्याकाळात लसीचा तुटवडा हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. जुलै महीन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरणाला गती मिळाली. महापालिकेप्रमाणेच खासगी रुग्णालयातही लस मिळू लागल्याचा ही चांगला परीणाम दिसु लागला.
सध्या लसीचा पुरवठा सुरळीत असला तरी आता महापालिकेच्या समोर सिरींजची उपलब्धता ही महत्वाची अडचण ठरत आहे. दहा टक्के अधिक संख्येने पाठविल्या जातात.हाताळणीत सिरींज खराब होण्याची शक्यता असल्याने त्याचा जास्त पुरवठा केला जातो. महापालिकेला सध्या प्रति दिन ५० हजार सिरींजची गरज असल्याची देखील आता माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला मालामाल; ‘टाटा’च्या 2 शेअरमुळे महिनाभरात कमावले 900 कोटी
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

