Share

‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला मालामाल; ‘टाटा’च्या 2 शेअरमुळे महिनाभरात कमावले 900 कोटी

Published On: 

मुंबई : शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपच्या दोन शेअरमधून महिनाभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. झुनझुनवाला यांनी ‘टाटा मोटर्स’ आणि ‘टायटन’ दोन शेअरच्या माध्यमातून ही कमाई केली आहे. या दोन्ही शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले असून वर्षभरात जवळपास 80 टक्के परतावा दिले आहेत.

टाटा मोटर्स ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीमध्ये राकेश झुनझुनलावा यांनी 1.14 टक्के भागिदारी आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 3.77 कोटी शेअर आहेत. झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2020 मध्ये हे शेअर खरेदी केले होते. तेव्हापासून या कंपनीने 150.84 टक्के परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये 15.61 टक्के वाढ झाली आहे. बुधवारीही या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले आणि शेअरची किंमत 150 पार केली आहे. टाटा मोटर्सने महिन्याभरात 15.61 आणि टायटनने 18 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांनी संपत्ती 907 कोटी रुपयांनी वाढली आहे.

टाटा मोटर्सप्रमाणे झुनझुनवाला यांनी टाटा समुहाच्याच टायटन या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. गोल्ड क्षेत्रातील ही कंपनी झुनझुनवाला यांनी आवडती आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4.26 कोटी शेअर आहेत. या शेअरने वर्षभरात 84.63 आणि महिन्याभरात 18 टक्के परतावा दिला आहे. बुधवारी हा शेअर 2155 रुपयांवर पोहोचला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!