Share

‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा केला. दरम्यान, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने तसे कळवले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बोचरी टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांना सरकार मदत करेल ही अपेक्षा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यासाठीच सरकारला पत्र लिहिलं होते. कोकणात अद्यापही मदत मिळालेली नाहीये. तुटपुंजी मदत जाहीर केली. पण तीही पूरग्रस्तांच्या हातात पडली नाही. आता त्वरीत शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावे लागेल, असा टोलाही माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

मागील तीन दोन दिवसांत मराठवाड्यातील १० पैकी ७ जिल्ह्यांत १७० ते १८० मिमी पाऊस झाला आहे. यंदा पावसाळ्यात तब्बल ४३६ नागरिकांचा बळी गेला. त्यात १९६ नागरिक वीज पडून मृत्यू पावले. सप्टेंबर महिन्यात ७१ लोकांचा जीव गेला असून २६ नागरिक जखमी झाले आहेत. तर ९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!