Share

पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावंच्या गावं पाण्यात गेल्याने अनेक संसार देखील उध्वस्त झाले आहेत.

अशात शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. तर पुराच्या कारणावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुराचे कारण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आणि भरीव मदत यावरून ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

‘एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा आता शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतत आहे,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मराठवाड्यातील गंभीर पूरस्थितीला प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ‘सत्तेत आल्यापासून राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाळीतच टाकले आहे. आम्ही सतत म्हणतोय शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत करा, मात्र तरीही दुर्लक्षच !,’ अशी टीका देखील त्यांनी केली.

यासोबतच, ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे १००% नुकसान झाले आहे. वर्षभराचे परिश्रम पाण्यात गेल्यामुळे राज्यभर आकांडतांडव पसरला आहे, मात्र तरीही राज्य सरकारकडून कसलीही तातडीने मदत नाही. सोयाबीन पूर्णपणे वाया गेलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आतातरी सरकारला ऐकू येईल का ?,’ असा सवाल करत पाटील यांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!