औरंगाबाद : अतिवृष्टी आणि कोविड प्रादुर्भावामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होवुन जनजीवनच उध्दवस्त झालेले आहे. शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेवर जणु आभाळच कोसळले असुन दैनंदिन जीवन जगणे कठीण झालेले आहे. अशा गंभीरस्वरुपाच्या परिस्थितीत शेतकरी बांधव व गोरगरीबांना दोन वेळेचे जेवण वेळेवर मिळत नसुन ते त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक जबाबदारी कशी पार पाडणार? विद्यार्थीयांची शैक्षणिक उन्नती कशी होणार? असे गंभीरप्रश्न निर्माण झालेले आहे. यावर शाश्वत उपाययोजना म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मिशन तालीम’ हा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
‘मिशन तालीम’ अंतर्गत सर्व प्रकारचे शैक्षणिक, शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे आणि स्पर्धा परिक्षांचे पुस्तके औरंगाबाद जिल्ह्यातील मदत करु इच्छिणाऱ्यांकडून संकलित करुन ते गोरगरिब व होतकरू विद्यार्थीयांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी ३०० विद्यार्थीयांना अभ्यासक्रमातील सर्व नवीन शैक्षणिक पुस्तके तसेच त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील उपलब्ध असलेली शैक्षणिक व स्पर्धा परिक्षासांठी उपयुक्त असे पुस्तके देवुन प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. ज्या विद्यार्थीयांना ऑनलाईन अर्ज सादर करुन सुध्दा शिष्यवृत्ती मिळाली नाही अशा सर्व विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळवुन देण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो यशस्वी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहु नये व शैक्षणिक उन्नतीसाठी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) ही विद्यार्थीयांचा हक्क असुन तो मिळालाच पाहिजे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षण घेत असलेल्या सर्व समाजातील विविध माध्यम व प्रवर्गातील शालेय ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थांनी मागील सतत तीन वर्षापासुन ऑनलाईन पध्दतीने स्कॉलरशिप मिळावी म्हणून भरलेल्या अर्जाची प्रत शहरातील विद्यार्थांनी खासदार कार्यालय, दिल्ली गेट रोड येथे जमा करावे व तालुक्यातील विद्यार्थांनी दिलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर पीडीएफ स्वरुपात पाठविण्याचे आवाहन विद्यार्थी, शिक्षण संस्था व पालकांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला मालामाल; ‘टाटा’च्या 2 शेअरमुळे महिनाभरात कमावले 900 कोटी
- भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या भुजबळांकडे २५ वर्षात २५ हजार कोटी कसे आले? आ. कांदेंचा सवाल
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

