🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान कोरोनाच्या या लाटीत देशभरात औषधे आणि ऑक्सिजन संचाची कमतरता भासत आहे. यादरम्यान अनेक मान्यवरांना आणि त्यांच्या कुटुंबीयाना कोरोनाची लागण झाली आहे.
यादरम्यान भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे वडिल किरनपाल सिंग यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. आता भुवनेश्वरची आई इंद्रेश यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. यामुळे काही दिवस त्यांना गावामध्येच ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधार न झाल्याने त्यांना शनिवारी ३० मे सकाळी त्यांना मेरठच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. इंद्रेश यांना कोरोनाची लागण झाली असल्याची चर्चा त्यांच्या गावात सुरु होत्या मात्र त्यांना कोरोना झाला की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. भुवनेश्वराच्या वडीलांचे निधन २० मे रोजी निधन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा ; नाना पटोलेंचा घणाघात
- काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच देशाचा कारभार सुरु : संजय राऊत
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर


