मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेस ने त्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजप सरकारची दुटप्पी भूमिका आहे, असं सांगतानाच देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशावासियांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं. मग आता सत्कार कराय करताय?, असा सवाल करतानाच सुटाबुटाचं सरकार म्हटल्यावर भाजपला त्रास झाला. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं असं मोदी सरकारला वाटतंय, अशी टीका पटोले यांनी केली.
बड्या उद्योगपतींचे 68 हजार कोटी रुपये केंद्र सरकार भरत आहे. फाईव्ह स्टार घोटाळा तर भाजपच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. रेमडेसिवीर बॅन असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं तरीही मोदी सरकारने आपल्या मित्रांसाठी ते वितरीत केलं. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा ताबा केंद्र सरकारने घेतला. टाक्या साफ नव्हत्या. त्यामुळे ब्लॅक फंगससारखे आजार निर्माण झाले, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आज काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलू मंत्री बाळासाहेभ थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मोदी सरकारवर भाजपवर टीका केली. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना स्थितीवरुन थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच देशाचा कारभार सुरु : संजय राऊत
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर
- माही आणि चिकूचं नातं दोन शब्दात सांग ; विराटला चाहत्याचा प्रश्न , दिलं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!


