🕒 1 min read
मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देशासाठी अजून बरच काही करणे बाकी असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन काही झालेले नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो, असेही म्हटले आहे.
‘सरकारने राहुल गांधी यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे. कोरोनामध्येच सरकारची दोन वर्षे तर निघून गेली. देशासाठी अजून बरच काही करणे बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेले नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा याला अपवाद नाहीत. हे कोणालाही नाकारता येणार नाही.’ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
‘सरकारला लोक बहुमताने निवडून देतात. याचा अर्थ लोकांचा सरकारवर विश्वास आहे. मात्र, देशात आजही महागाई आहे. बेरोजगारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अराजकता आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. सर्वांना अदानी, अंबानी बनायचे नसते. त्यांना रोजगार हवा असतो. उत्तम आरोग्य आणि शिक्षण हवे असते. गेल्या सात वर्षात आपण जनतेला हे देऊ शकलो का? याचं मोदी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. मोदींकडे नेतृत्व क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशा देतील, जनतेला योग्य मार्ग दाखवतील याची आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मोदींना अजून बरंच काही करणं बाकी आहे,’ असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्जुन आता मलायकाचा शेजारी ; घेतला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- शालूच्या फोटोवर कमेंट्सची गर्दी ; पहा घायाळ करणारा अंदाज
- आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर
- माही आणि चिकूचं नातं दोन शब्दात सांग ; विराटला चाहत्याचा प्रश्न , दिलं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

