Share

आयपीएलची घोषणा केली, मात्र टी-२० विश्वचषकासाठी मागितला एक महिन्याचा अवधी; खरे कारण आले समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड संघादरम्यान ५ कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे.

मात्र यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली सध्या आयपीएल आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. यातील आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याविषयी घोषणा करण्यात आली. मात्र विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने एक महिन्याचा कालावधी वाढवून मागीतला. विश्वचषक स्पर्धा ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजीत करण्यात आली आहे. त्यावेळी भारतातील कोरोना परिस्थीतीचा अंदाज लावणे आता शक्य होणार नाही. महत्वाची बाब म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळी भारत सरकारकडून बीसीसीआयला करात सुट हवी आहे.

मात्र बीसीसीआय अजुनही याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने एक महिन्याचा अवधी वाढवून मागितला आहे. भारत सरकारचे नियम बीसीसीआयसाठी बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमिवर बीसीसीआयने मागीतलेला एक महिन्याचा अवधी आयसीसी मान्य करते का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरीत सामन्याचे आयोजन हे युएईमध्ये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!