मुंबई: भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार काल (२४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली. यावरच राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मंगेशकर कुटुंबियांना वाटलं की, आपण पंतप्रधान मोदींचे कौतुक करायला हवे, म्हणून त्यांनी मोदींना बोलावले. त्यांना वाटलं की, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची गरज नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लता मंगेशकर असताना आणि त्या गेल्यानंतरही अगदी नाशिकच्या रामकुंडापर्यंत शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी त्यांना मदत केली. पण तरीही त्यांना मुख्यमंत्री नको वाटले.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकल्याने अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला दांडी मारत काल सहकुटुंब शिवडीमधील शिंदे आजींच्या भेटीला गेले होते. मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये शिंदे आजी दिसून आल्या होत्या. त्यांचा पुष्पा स्टाईल ‘झुकेगा नही’ हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “यूपी आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा” – संजय राऊत
- भाजप-शिवसेना संघर्ष दिल्ली दरबारी, पक्षाचं शिष्टमंडळ गृहसचिवांच्या भेटीला!
- अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; म्हणाल्या, “बाई या शब्दाचा…”
- “…तर त्याचं मूळ मातोश्री आणि औषध देवेंद्र फडणवीस सरकार आहे”, सदाभाऊ खोत यांचा टोला
- “अप्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन..”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा


