Share

“यूपी आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वादात आता भाजपने उडी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. यामध्ये ते जखमी झाले होते.

आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी किरीट सोमय्या दिल्लीला गेले आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. दिल्लीत जाण्याएवढं महाराष्ट्रात काय झालं आहे? असा सवालही राऊतांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.

राऊत म्हणाले, “हे सर्व महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं. यूपीमध्ये अत्याचार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावायाची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्हीकडे एकत्र लावा. दोन चार लोक दिल्लीला जातात. माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात. तसेच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी प्रतिक्रिया देतान ते म्हणाले, संजय पांडे हे एक निष्पक्ष आणि सक्षम पोलिस अधिकारी आहेत. ते प्रामाणिक अधिकार आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करु नयेत”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!