Share

“राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचं उल्लंघन केलं, तर…”, भीम आर्मीचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचे जर राज ठाकरेंनी उल्लंघन केले, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत, असे भीम आर्मीने म्हंटले आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्थी

१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
५) 1 मे रोजी महाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
९) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!