Share

“नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत मविआ सरकारला चांगलेच सुनावले आहे.

“काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे, तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांचा निर्णय जाहीर केलाय.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय असून यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. हाच फोटो ट्वीट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!