मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २७ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून निशाणा साधलाच परंतु आज माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.
“ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही द्वेषपूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. ते देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही, तिथेही संवेदशनशील असायला हवं. पण दुर्दैवाने महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच सामना अग्रलेखातून पंतप्रधानांवर निशाणा साधला असे म्हणता येणार नाही. जी भूमिका स्पष्ट करायची आहे, ती आम्ही स्पष्ट केली. ज्या राज्यात त्यांचे मुख्यमंत्री नाही, त्याच राज्यांवर त्यांनी बैठकीमध्ये टीका केली. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान “मोदी यांनी ‘कोरोना’ बैठकीत इंधन दरवाढीचा विषय काढला. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावा असे पंतप्रधानांनी सुचवले. स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी हे प्रत्येक बाबतीत राज्यांना जबाबदार धरत आहेत. मग केंद्र सरकार फक्त सत्ता भोगायला बसले आहे काय? पेट्रोल-डिझेलची भाववाढ, कोळशाचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा यासाठी त्यांनी राज्यांनाच जबाबदार ठरवले. मग केंद्र काय फक्त घंटा वाजवायला बसलेय.”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सामनातून मोदींवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
- “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
- “राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव यशस्वी…” – एकनाथ खडसे
- अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का?; मुरलीधर मोहोळ यांचा संजय राऊतांवर निशाणा
- “योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- “ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला


