Share

“…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल

Published On: 

मुंबई: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावरूनच उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले असल्याचे  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत संजय राऊतांना खोचक सवाल केला आहे.

“जनाब संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाचा असा काही निर्णय असेल तर मग त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, असा प्रतिसवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत संजय राऊत यांना केला आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

“उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. अशाच प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच सरकारची भूमिका आहे. तसेच ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!