🕒 1 min read
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार, याबाबत चर्चा सुरू आहे. यावर अनेक वेळा भाजपला विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं नव्हत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
राज ठाकरे आणि बावनकुळे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण :
राज ठाकरे आणि बावनकुळे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांचं उत्तर राज ठाकरे यांनी एका वाक्यात दिलं असून मी फक्त माध्यमामधूनच या चर्चा अथवा बातम्या ऐकत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व पदे बरखास्त :
गेल्या दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतर बंदी उठल्यानंतर मी पहिल्यांदा विदर्भ दौऱ्यासाठी आलो आहे. दोन वर्षात सगळं शांत होतं. नागपूरमधील काही झाडाझडती बाकी होती, ती काल झाली, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व पदे बरखास्त करत असल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी होत आहेत. यावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून राजकारण्यांकडून जर अशा प्रकारे अपमान घडत असतील तर लोकांनी त्यांना अद्दल घडवणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच जे चुका करत असतील आणि तरीही लोक त्यांना मतदान करत असतील तर त्यांना अद्दल घडणार नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | शिंदेंनी दिला भाजपलाच धक्का! 100 हून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
- Devendra Fadnavis | सर्वांना सोबत घेऊन बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली – देवेंद्र फडणवीस
- Smartphone New Launch | लवकरच लाँच होणार Tecno POP 6 Pro ,लाँच पूर्वीच जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत..
- Eknath Shinde | सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील – एकनाथ शिंदे
- Deepak Kesakar | “वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…” ; केसकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
