टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री या निवासस्थानी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे.
मागील अनेक महिने जाधव शांत होते. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत फारसे विश्वासात घेत जात नसल्याचे चित्र होते. नुकतीच त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन परत शिवसेनेत येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. आज अखेर त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे कोकणातही राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.
भास्कर जाधव हे दोन वेळा गुहागर मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या डॉ. विनय नातू आणि शिवसेनेच्या विजय कुमार भोसले यांचा पराभव केला होता. जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कोकणात शिवसेना अजूनच मजबूत झाली आहे.
- जीवनात एकदा तरी शिवसेनेचा आमदार व्हायचंय – पाटील
- युतीत २० ते २५ जागांची अदलाबदली होण्याची शक्यता
- शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय – भास्कर जाधव
- कॉंग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ आमदार करणार शिवसेनेत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

