टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेने जागावाटपांसाठी चर्चा सुरु केली आहे. प्राथमिक चर्चांनंतर दोन्ही पक्षांचे प्रमुख जागावाटपाच्या आकडेवारीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत युतीत जागावाटप करताना २० ते २५ पेक्षा जास्त जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. आयात झालेल्या नेत्यांची आकडेवारी, विद्यमान आमदारांची कामगिरी, आणि जागावाटपात पक्षाला वाटून येणाऱ्या जागा या सर्व शक्यता लक्षात घेऊन अदलाबदली करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी देयची आणि कोणत्या पक्षाकडून देयची हा मोठा प्रश्न युती समोर आहे. तसेच काही मतदार संघांमध्ये भाजप – सेनेचे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्या मतदारसंघातील विरोधक ही सेना – भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे सेना – भाजपच्या काही आमदारांची गच्छंती देखील होण्याची शक्यता आहे.
मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये चार ते पाच जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये गोरेगाव, नायगाव या दोन प्रमुख जागांचा समावेश आहे. विद्यमान आमदारांनी सेना भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ऐरोली, उस्मानाबाद, अकोले, सिल्लोड या जागांवर सेना भाजपमध्ये अदलाबदल केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सोमवारीच जागावाटपाच्या चर्चेची दुसरी फेरी पार पडली होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. एवढा कमी वेळ शिल्लक असताना भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून संदिग्धता आहे. त्यातच आता युतीच्या घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
- पाचपुते सोडून मी दुसऱ्याची शिफारस करेलच कशी ? – सुजय विखे
- आरक्षणावरून राज्य सरकार बनवाबनवी करतंय : अजित पवार
- इमरान खान आणि नरेंद्र मोदी एकाच आईची मुले : कॉंग्रेस
- मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहात का ? गिरीश महाजन म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

