टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असून मी 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करत आहे. असे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. भास्कर जाधव यांनीच याबाबतची घोषणा केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी त्यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे.
मागील अनेक महिने जाधव शांत होते. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत फारसे विश्वासात घेत जात नसल्याचे चित्र होते. नुकतीच त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन परत शिवसेनेत येण्याची ईच्छा व्यक्त केली होते. जाधव हे मुळचे शिवसैनिकच होते.
महत्वाच्या बातम्या
- सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे – जयंत पाटील
- भाजपने जनतेचा विश्वासघात केला – धनंजय मुंडे
- उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत : जयंत पाटील
- ‘कोणी शिल्लक राहिलं नाही, शिवस्वराज्य यात्रेला आता ‘शोध यात्रा’ म्हणावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

