🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षात महत्त्वाची मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 40 आमदारांसोबत भाजप सोबत युती केली. मात्र आता एकनाथ शिंदे गटाने भाजप पक्षालाच मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील १००हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे गटाचा भाजप पक्षाला धक्काः
शिवसेना, राष्ट्रवादी नंतर शिंदे गटाने सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत काल भाजपच्या १००हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एवढंच नाहीतर प्रकाश सुर्वे यांनी देखील स्वतः या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत.
सुर्वे यांच्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक २५ मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हळूहळू राज्यभरातून वेगवेगळ्या शहरांमध्ये नगरसेवकांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार आणि बारा खासदारांना घेऊन बंड केला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता प्राप्त केली. यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील – एकनाथ शिंदे
- Deepak Kesakar | “वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…”; केसकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Ramdas Kadam | “बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का?” रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam | “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; रामदास कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
