🕒 1 min read
मुंबई : काल पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधारी पक्षनेत्यांनी गळ्यात एक पोस्टर घालून घोषणा बाजी केली. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला होता. नेत्यांनी गळ्यात घातलेल्या पोस्टरवर ‘युवराजांची दिशा चुकली’ असं लिहिण्यात आलं होतं. मात्र यावरून सत्ताधाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी सडकून प्रत्युत्तर देखील दिलं होतं. अशातच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या घोषणेचा अर्थ स्पष्ट केला आहे.
भाजपासोबत नैसर्गित युती करायला हवी होती-
‘युवराजांची दिशा चुकली’यामध्ये ‘दिशाचा’ अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी आघाडी करायला नको होती. त्यांनी भाजपासोबत नैसर्गित युती करायला हवी होती. गेल्या दोन-अडीच वर्षांत तुम्ही बघितलंत, हे आम्हाला कमी कमी करत चालले होते, असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
भरत गोगावले यांनी वैयक्तिक जीवनावर आम्ही काही बोलणार नसल्याचं सांगितलं-
तसेच, ‘दिशा’ या शब्दाचा संबंध दिशा पटनीशी आहे का? असं गोगावले यांना विचारलं असता, दिशा पटनी वगैरे आम्हाला काही माहिती नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आम्ही काही बोलणार नाही. ते अजून तरुण रक्त आहे. लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्यांना काही अधिकार आहेत. त्यावर आम्ही काही बोलू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईतले रस्ते काँक्रिटचे होणार-
पुढे गोगावले यांनी मुंबईच्या रस्त्यावरून विरोधकांवर पुन्हा हल्ला केला. वर्षभरात मुंबईतले सगळे रस्ते काँक्रिटचे केले जाणार असून, काल राज्य सरकारने 5 हजार कोटींच्या ऑर्डर दिल्या आहेत. भविष्यात कुणी बोलता कामा नये की रस्त्यांना खड्डे पडलेत. मग मुंबईकरांना काय हवंय अजून? हे निर्णय आधीचं सरकारही घेऊ शकत होतं. त्यांचे हात कुणी धरले होते?, असा सवाल देखील गोगावले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | बहुमत असुनही मोदी सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरते- शिवसेना
- Shivsena । भाजपाचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे; शिवसेनेचा हल्लाबोल
- Ajit Pawar | शिंदे सरकारला मान्यता मिळाल्यास लोकशाहीला धोका- अजित पवार
- Winter Session | तारीख ठरली! या वर्षीचं हिवाळी अधिवेशन होणार ‘या’ तारखेला
- Supriya Sule | …म्हणून दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
