🕒 1 min read
मुंबई : या वर्षीच पावसाळी अधिवेशनचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता या वर्षीच हिवाळी अधिवेशन कधी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नागपूर मध्ये शेवटचं हिवाळी अधिवेश 2019 नंतर झालं होतं. त्यानंतर गेली दोन वर्ष कोरोना विषाणुने सगळीकडे थैमान घातलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होऊ शकलं झाले नाही.
हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार-
मात्र या वर्षीच हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याचं समजतं आहे. एवढंच नाहीतर अधिवेशनाची तारीख सुद्धा ठरली आहे. सोमवार 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज्याचं या वर्षीचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.
तसेच आतापर्यंत महाराष्ट्राची जवळपास सगळीच हिवाळी अधिवेशनं ही नागपूरला झाली आहेत, पण महाविकासआघाडी सरकार याला अपवाद ठरलं अशल्याचं सत्ताधारी म्हणत असल्याचं बोललं जात आहे.
महाविकासआघाडी सरकारला नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही-
नागपूर पॅक्टनुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं लागतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही. त्यावर्षीच अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशन नागपूर पॅक्टचा सन्मान म्हणून नागपूरमध्ये घेण्याची मागणीही भाजपने केली होती. परंतू उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे त्यावेळी मुंबईमध्ये अधिवेशन पार पडलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “एकेकाळी इंदिराजींचा होता वट, पण आता टोमणे सेनेसोबत काँग्रेसची झाली फरफट”
- Assembly Session 2022 | “आम्ही गद्दारीचा मुखवटा फाडणार” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- महाराष्ट्रात पुन्हा एकदा विदर्भ सिंचन घोटाळा चर्चेत, अजित पवार अडचणीत येणार ?
- Eknath Shinde | आम्ही गद्दारी केली असती तर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले असते का?
- Eknath Shinde । रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं, दिल्लीमधील ‘त्या’ फोटोतल्या टीकांवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
