Share

Supriya Sule | …म्हणून दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो- सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मागिल दोन वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. या काळामध्ये देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होत. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी कॅग रिपोर्ट सादर करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्येही राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवल्याबद्दल कॅग रिपोर्टमध्ये तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांचं कौतुक करण्यात आलं आहे. अशातच यावर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी केलं अजित पवारांचं कौतुक-

यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी कोरोना, लॉकडाऊन, मंदी अशा बिकट परिस्थितीत देखील राज्याचे अर्थखाते यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल कॅग रिपोर्टमध्ये तत्कालिन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे कौतुक केलं आहे. या काळात राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यात सरकारला यश आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो-

तसेच त्याकाळामध्ये अजितदादांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. प्रशासनावरील पकड,उत्तम नियोजन आणि अभ्यास यांच्या जोरावर अजितदादांनी राज्याची आर्थिक बाजू यशस्वीपणे सांभाळली.याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो, असं कौतुक सुळे यांनी केलं आहे.

वित्तीय तूट कमी करण्यात राज्य सरकारला यश –

दरम्यान, राज्यावर 2016-17 साली 4 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं, हे कर्ज आता 5 लाख 48 हजार 176 कोटी रुपये एवढं झालं आहे. कोरोनाच्या काळात राज्याचा जीडीपी 3 टक्क्यांनी कमी झाला. लॉकडाऊनचा फटका उद्योग आणि सेवा क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला, पण शेतीमुळे हा फटका कमी बसला. कृषी क्षेत्रात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. तर जीएसटीमध्ये 15.32 टक्के आणि व्हॅटमध्ये 12.24 टक्क्यांची घट झाल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.त्याचप्रमाणे कोरोनाचं संकट असताना राज्याचा जीडीपी कमी झाला असला तरीही वित्तीय तूट कमी करण्यात राज्य सरकारला यश आल्याचंही कॅग रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!