🕒 1 min read
मुंबई: देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १ लाख ७६ हजार लसीकरणाची नोंद झाली. तर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिसाद लाभला आहे. मात्र जसे १८ वयोगटापुढील नागरिकांना कोरोना डोस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल घ्यावी लागते, तशीच लहान मुलांनाही घ्यावी लागेल का, याबाबत भारत बायोटेकने महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारत बायोटेकनं (Bharat Biotech) म्हटलं आहे की, ‘आम्हाला लसीकरणासंदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात काही लसीकरण केंद्रावर लहान मुलांना कोवॅक्सिन लसीसोबत तीन ५०० मिलीग्रॅमच्या पॅरासिटामॉल गोळ्या घेण्याची शिफारस करत आहेत. मात्र कोवॅक्सिनची लस दिल्यानंतर कोणत्याही पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर औषधांची शिफारस केली जात नाही.’असे भारत बायोटेकनं ट्वीट करत म्हटले आहे.
#bharatbiotech #covaxin #covid #covid19vacccine #immunization #vaccination #childrensafety #clinicaltrials #vaccinatedandhappy pic.twitter.com/Pri0u0UlFe
— Bharat Biotech (@BharatBiotech) January 5, 2022
तसेच ३०,००० लोकांच्या क्लिनिकल चाचण्यांद्वारे, अंदाजे १० ते २० टक्के लोकांनी साइड इफेक्ट्स नोंदवले आहेत आणि त्यापैकी बहुतेक सौम्य होते, एक किंवा दोन दिवसात ते बरे देखील झाले. तसंच त्यांना कोणत्याही औषधाची आवश्यकता नव्हती, असंदेखील कंपनीनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या’ घटनेवरून अमरिंदर सिंग यांनी केली पंजाब मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
- ‘विषाचे कडू घोट प्राशन करून सिंधुताईंनी अनाथांच्या आयुष्यात हसू फुलवलं’
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- “पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी नव्हती, दौरा रद्द करण्यास सांगितले होते”; चरणजीत सिंह चन्नींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
