Share

मोठी बातमी : अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

कोरोनाच्या विळख्यात अनेक नेते अडकत आहेत. कालच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कॉंग्रेसचे बडे नेते राहुल गांधी यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!