मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाच्या दोन काचा फुटल्या. तर सांगली शहरातही शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक बनले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर असलेल्या पोस्टरवरील नारायण राणे यांच्या प्रतिमेला काळे फासले.
यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि पोलिसांना इशारा दिला आहे. ‘आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही, उद्या आमच्या कार्यालय हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पोलस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू. तालिबान नाही, कायद्याचे राज्य असले पाहिजे. भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केल्यास खबरदार, ते सहन केलं जाणार नाही. आमच्या कार्यालयावर हल्ला केलेल्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास त्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते जाऊन बसणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
‘आमच्या कार्यालयावर दगडफेक केली तर खबरदार. आम्ही हे खपवून घेणार नाही. दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही. शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही,’ असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा; सरदेसाईंची मागणी
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

