🕒 1 min read
मुबई : आता गणेशोत्सवाची धूम सर्वत्र दिसू लागली आहे. त्याच प्रमाणे छोटया पडद्यावरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेच्या कलाकांरांमध्ये ही उत्साह दिसू लागला आहे. विशेष म्हणजे ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांना खास शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
गणपती बाप्पावर आधारित या मालिकेत विघ्नहर्ता गणेशाची भूमिका वठविणाऱ्या अद्वित कुलकर्णी हा छोटा कलाकार आपल्या भावना व्यक्त करतांना बोलला की, गणेशा आपल्या सर्वांच्या जीवनातील कष्ट दूर करून सर्वांना आरोग्यमय जीवन जगण्याचा आर्शीवाद द्या. गरजूंना भोजनदान करणार असून या ‘कठिण काळात एक दूसऱ्यांची मदत करणं ही देखील एक प्रकारची पुजाच आहे’ असे या मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता हितांशू जिंसी यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
मीराबाईच्या भूमिकेत वावरणाऱ्या लवीना टंडनच्या म्हणाली यावर्षी मित्रपरिवारांसोबत गणेशोत्सव साजरा करणार आहे. आपल्यासाठी गणेशोत्सव खास असल्याचं पार्वतीची भूमिका करणाऱ्या कलाकार मदिराक्षी मुंडल ने व्यक्त केले. तर दरवर्षी जशी धुमधाम असते, तसेच या ही गणेशोत्सवास भक्तांना चांगले आरोग्य आणि आनंद मिळावं हीच मनोकामना व शुभेच्छा असे ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेतील शंकराची भूमिकेतील मलखान सिंह यांनी व्यक्त केले. गणेशावर आधारित या मालिका प्रेक्षकांना खूप आवडत असून पुढील दहा दिवस त्यांच्यासाठी खास पर्वणीच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

