औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रेशनिग दुकानदार व पुरवठा विभागाचा ऑन लाईनचा घोळ संपता संपेना यामुळे गरजु गरिब लाभार्थीना स्वस्त व मोफत धान्यापासून वंचित राहावे लागत असुण तालुका पुरवठा विभाग हातावर हातावर ठेवून मुग गिळून बसला असल्याचे चित्र आहे.
खुलताबाद तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष व भारतीय जनता अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर यांनी खुलताबाद तहसील येथे निवेदन दिले आहे की देवळाना खुर्द बुद्रुक व लोणी येथील २०१८ व २०२१ पर्यंत अनेक राशन कार्ड ऑनलाईन असून ही त्यांना आजपर्यंत राशन कार्ड वर धान्य मिळत नाही. गरिब, भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक दिव्यांग लोकांना धान्य न मिळाल्यामुळे ते परेशान असुण त्यांची फरफट होत आहे. कोरोना काळामध्ये मोफत व पैशाने या व्यक्तींना धान्य मिळणे अत्यंत गरजेचे होते.
परंतु पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हे लाभार्थी वंचित राहिलेले आहे. व ऑन लाईन शिधापत्रिका असताना रेशन न मिळण्याच कारण काय? यात कोरोना काळात गरिब खरे गरजु यांना खरच मोफत धान्य मिळाले का? ज्यांना धान्य मिळाले नाही.त्यांचे धान्य कोठे गेले याची चौकशी होने गरजेचे आहे. यात खरे ते समोर येईल.
यात तालुक्यात ठिकठिकाणी रेशन दुकानात हीच तक्रार समोर येते पुरवठा विभाग म्हणते शिधापत्रिका ऑन लईनणी झाले व दुकानदार म्हणतो ऑन लाईन झाले नाही तुमचा माल आला नाही असे उत्तर मिळते यात गरिब खरा गरजु लाभार्थी धान्य पासून वंचित राहत आहे. तरी मा. तहसीलदार यांनी याची चौकशी करुन गरिब खरे व गरजु लाभार्थी व दिव्यांग लाभार्थीना धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सय्यद युसुफ व सत्तार पटेल यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


