🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी यूएईमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्यानं त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या अगोदरच कोणता संघ आयपीएल विजेता होणार याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातच टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं स्पर्धा कोण जिंकणार याची भविष्यवाणी केली आहे. अनेक दिग्गजानी याआधी आयपीएल कोण जिंकरणार यावर भाष्य केलं आहे. अनेकांनी यावेळी मुंबई इंडियन्सच नाव घेतलं आहे. तसेच हा संघ आयपीएल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हंटल आहे.
प्रसिद्ध वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेहवागनं विजेत्या संघाचं नाव संघितलं आहे. यावेळी सेहवाग म्हणाला, ‘दुसऱ्या टप्प्यात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. माझ्या मते दिल्ली आणि मुंबईची टीम विजेतेपदाची दावेदार असेल. पहिल्या टप्प्यात चेन्नईचा सरासरी स्कोअर 201 होता. पण यूएईच्या पिचवर त्यांच्या बॅटींगवर परिणाम होईल, असं मला वाटतं. मला एका टीमची निवड करायची असेल तर ती टीम मुंबई असेल,’ असं सेहवाहनं स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळून आल्या अॅण्टीबॉडीज्
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
