Share

‘आधी सरकारी पैसा कब्रस्थानांवर खर्च होत होता, आता मंदिरांवर होतोय’, योगींचे वादग्रस्त विधान

Published On: 

🕒 1 min read

आयोध्या : आधीच्या सरकारने केवळ कब्रस्थानांवर खर्च केला होता मात्र आमच्या सरकारने मंदीर सजावट व पुन:निर्माणासाठी सरकारी पैसा वापरला आहे. असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी केले आहे. ते आयोध्येमधील दिपोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पाच वर्षांपूर्वी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनीही असेच वक्तव्य करुन नव्या वादाला सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने केलेल्या कामांचा दाखला देताना योगी यांनी हे वक्तव्य केलं आहे. आमच्या सरकारने सरकारी पैसा हा मंदिरांची सजावट, पुन:निर्माणासाठी वापरला. आधीच्या सरकारने केवळ कब्रस्थानांभोवती कुंपणाच्या भींती बांधण्यासाठी पैसा वापरला होता, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

पुढे योगी म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये बदल दिसतो आहे. पूर्वी राज्यामधील लोकांचा पैसा हा कब्रस्थानांच्या भींती बांधण्यासाठी खर्च केला जायचा. आज हा पैसा मंदिरांचा पुन:विकास आणि सुशोभिकरणासाठी वापरला जात आहे. हा विचारांमधील फरक आहे. ज्यांना कब्रस्थानांची काळजी होती त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचे जनत करण्यासाठी वापरत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने ५०० हून अधिक मंदिरांचे विकासकामे हाती घेतल्याचे योगींनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिर उभारणीतील सर्व अडथळे दूर करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. आता जगातील कोणतीही ताकद हे मंदिर उभारण्यात अडथळा आणू शकत नाही असं म्हणत योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!