रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अंगलट आले आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आले. राणे यांनी केलेले वक्तव्य आणि त्यावरून झालेली अटक यामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला आहे.
मात्र, त्यापूर्वी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चातर्फे राणेंचा सत्कार करण्यात आला. जन आशीर्वाद यात्रेचं चिपळूणच्या अभिरुची हॉलमध्ये भाजपा तर्फे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वाट मोदीजींनी मोकळी करून दिली आहे. तरी आता मागे हटू नये असे म्हणत मराठा समाजाला प्रोत्साहित केले.
चिपळूण येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वाट मोदीजींनी मोकळी करून दिली आहे तरी आता मागे हटू नये असे प्रोत्साहित केले.#JanAshirwadYatra pic.twitter.com/qa25IYLJt7
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
त्यानंतर जन आशीर्वाद यात्रेच्या संगमेश्वर येथे आयोजित राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘राज्यात यांची सत्ता आहे. आमदारकीचे ५६ आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करुन यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. पण इथे १२ झेंडे दिसत आहेत. काय अवस्था झाली आहे यांची. मी जर आत्ता सांगितलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. हे काही दिवसांनी सत्तेवर नसतील. घरी जावा नाहीतर आम्हाला घरी पाठवावे लागेल.’ असे राणे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं”; नारायण राणे पुन्हा बरसले
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा


