Share

विद्यार्थिनी डॉक्टरच्या रॅगिंगला कंटाळून बीडच्या एमडी डॉक्टरची आत्महत्या

Published On: 

बीड : नाशिक येथील डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर मध्ये एमडी स्त्रीरोगशास्त्र द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह ऑपरेशन थेटरच्या बाथरूममध्ये सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या वहीमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये दोन विद्यार्थिनींच्या त्रासाला आणि रॅगिंगला कंटाळलो असल्याचा उल्लेख केलेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. नातेवाईकांनी मृत्युस कारणीभूत असणाऱ्या विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती. दरम्यान आयुक्तांनी आपण स्वतः लक्ष घालून शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करू या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

गेवराई तालुक्यातील देवपिंप्री येथील व हल्ली बीड येथील श्रीरामनगर येथे राहणारा स्वप्नील महारूद्र शिंदे ( वय २६ ) हा नाशिक येथील डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.स्त्रीरोगशास्त्र या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान, मंगळवार दि.१७ रोजी रात्री साडेअकरा वाजता डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या ऑपरेशन थेटरमधील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. स्वप्नील शिंदे याने वरिष्ठ विद्यार्थिनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे, असा आरोप स्वप्निलच्या नातेवाईकांनी केला आहे.

स्वप्नीलच्या वहीत इंग्रजी भाषेत एक सुसाईड नोट लिहिलेली सापडली असून या सुसाईड नोटमध्ये आपल्यावर रॅगिंग केली जात असल्याचा उल्लेख आहे. यात दोन विद्यार्थिनीच्या नावाचाही उल्लेख आहे. ज्या विद्यार्थिनीचा यामध्ये उल्लेख आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

एमबीबीएसच्या चारही वर्षात गोल्ड मेडेलिस्ट, रँगिंगमुळे दोन महिने घरी
डॉ. स्वप्नील शिंदे हा अत्यंत हुशार होता. नाशिक येथील याच काँलेजमध्ये तो एमबीबीएसच्या चारही वर्षात प्रथम आलेला असून गोल्ड मेडेलिस्ट होता. दरम्यान त्याच्या बँचमध्ये एकुण १२ मुली आहेत, तर स्वप्नील हा एकटाच या बँचमध्ये मुलगा होता. दरम्यान या बँचमधील वरिष्ठ दोन विद्यार्थ्यांनी सतत रँगिंग करत असल्याने तो दोन महिने घरीच होता. यानंतर तो आईसोबत नाशिक येथे जाऊन पुढील शिक्षण घेत होता.

मात्र, तरीही सदरील मुलीच्या सततच्या रँगिंगमुळे त्याने जीवन संपवल्याची शक्यता आहे. तर स्वप्नील च्या नातेवाईकांनी स्वप्नील चा खुन झाल्याचा आरोप देखील केला आहे. त्याच्या छातीवर जखमा असून संबंधीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या दोन्ही मुली या उच्च घराण्यातील असल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!