Share

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाच मागणारा कर्मचारी निलंबीत

Published On: 

तुळजापूर : कोरोनाचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहेत.यातच कोरोना बाधीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना तुम्हाला सवलती देतो म्हणून मयताच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी पैशाची लाच मागणा-या ऐका कर्मचा-यास तडकाफडकी निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील शेतमजूर बापू गोरख माळी या कोरोनारुग्णाचा नुकताच मृत्यू झाला होता. रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुळजापूर मध्ये तुटवडा असल्याने त्यांना रेमेडीसीवीर इंजेक्शन मिळाले नाही यामुळेच पुढे कोरोना उपचारा दरम्यान तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे निधन झाले होते. यावेळी अंत्यसंस्कार करणा-या शंकर कांबळे यांने स्वःताच्या मोबाईल वरून ५ हजाराची मागणी केली. मात्र त्या नातेवाईकाकडे ४ हजार होते त्यांनी ते दिले आणि अंत्यसंस्कार पार पडले.

या बाबतीत मुख्याधिकारी अशिष लोकरे यांना याची माहीती मिळताच नगर पालीकेचे मुख्याधिकारी यांनी सदरील कर्मचारी शंकर कांबळे यांना बोलवुन घेवुन जाब विचारताच त्याने पैसे घेतल्याचे कबुल केले . सदरील पैसे स्वखुशीने दिल्याचे सांगितले माञ ते सिध्द करता न आल्याने मुख्याधिकारी लोकरे यांनी तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले.व सदरील रक्कम मयताचा नातेवाईकास परत करण्यास भाग पाडले.सदरील कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबीत केल्याने पैसे खाणा-या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणुन गेले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!