बीड : बीडचा पीकविमा पॅटर्नबाबत एवढ चांगल बोलल गेलं, की पंतप्रधानांच्या कडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टामंडळ नेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल की हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करा. हा अतिशय चांगला पॅटर्न. हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करण्याचा प्रयत्न झाला. पण तो यंदा लागू होऊ शकणार नाही. तो फक्त बीडपुरता मर्यादित राहणार आहे. पुढच्या वर्षी प्रयत्न करु अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सुदैवाने यावर्षी बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, खरीप हंगामासाठी काही अडचणी आहेत का? कोरोना परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाता यावे नाही या प्रमुख विषयांवर आढावा बैठक घेऊन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला आणि कृषी विभागाला अजित पवारांनी सूचना दिल्यात. बीड जिल्ह्यातील पीक विमा पॅटर्न बाबत आपण अधिक माहिती घेऊन अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
त्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. संजय दौंड, आ. बाळासाहेब आजबे या बैठकीला उपस्थित होते.
गुजरात सरकारने पिकविमा बंद केला
पीकविम्याच्या बाबतीत वेगवेगळे प्रवाह आहे. काही राज्यांनी तर ती बंदच करुन टाकली आहे. आम्ही जेवढे पैसे भरतो, विशेषतः शेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून तेवढे पैसे मिळत नाही. पीकविमा कंपन्यांचाच फायदा होऊन जातो. गुजरात सरकारने देखील तेथील पिकविमा बंद केला. देशातील इतर राज्यातही बंद झाला आहे. आपल्या महाराष्ट्र पुरत बोलायच झाल तर परवा मी आणि राजेश टोपे कोल्हापुरात होतो. तेथे पिकविमा उतरण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार टक्के आहे. अर्थात तो ऐच्छिक आहे. एकीकडे बीडचा पिकविमा पॅटर्न चांगला आहे, शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, असं कृषी विभाग सांगतो. दुसरीकडे फिल्डवर गेल्यावर दुसर ऐकायला मिळते, याची शहानिशा केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये


