Share

‘यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत युती करत असतो’, रामदास आठवलेंनी सांगितले कारण

Published On: 

नाशिक : नाशिकच्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी दगाजी चित्रमंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आठवले यांनी युतीबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. सत्तेसाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने युतीची भूमिका स्वीकारत राजकारण करत आहे.

‘१९९८ साली काँग्रेससोबत आघाडी केल्याने रिपाईचे चार खासदार निवडून आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी राजकीय निर्णय घेत असतो. केंद्र सरकारमध्ये मी सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, आसामपासून गुजरातपर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे , असे रामदास आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!