🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळले असून फक्त सही पुरतेच मंत्री असल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राणेंवर शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मी माझ्या पक्षात पूर्ण समाधानी आहे. मला माझ्या खात्यांतर्गत विषयावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला दिलेलं काम मी नियोजनबद्ध रितीने पार पाडत आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
मी शिवसेनेला कंटाळलो असल्याचा शोध राणेंनी कुठुन लावला मला माहित नाही. मी माझ्या विभागात स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र नसतो तर कोणतेच निर्णय घेऊ शकलो नसतो. ‘मातोश्री’ किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, राणे स्वतःही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असल्याने उद्या धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारूनच तो निर्णय घ्यावा लागेल. त्यात गैर असे काहीच नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही एवढंच मला स्पष्ट करायचे आहे, असे शिंदेंनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही.मी माझ्या पक्षात पूर्ण समाधानी आहे.मला माझ्या खात्यांतर्गत विषयावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,मला दिलेलं काम मी नियोजनबद्ध रितीने पार पाडत आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/nMrDHqup5Z
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
