मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळले असून फक्त सही पुरतेच मंत्री असल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राणेंवर शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर आता आमदार आशिष शेलार यांच्या पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे.
‘नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, कॅबिन स्टाफ मिळतो पण या मंत्रीमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
शेलार काय म्हणाले होते ?
‘एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. पण त्या नगर विकास खात्यात सुनियोजितपणा नाही. पर्यावरण मंत्री सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेताना आम्हाला दिसतंय. सध्या सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे,’ असं आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. पुढे ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
- ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर… ४००० किलोमीटर प्रवास मोफत; नव्हे ही तर अफवा!
- ‘शिंदेंनी ‘ते’ नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर मी…’; आशिष शेलार यांचं सूचक विधान

