मुंबई : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ठाकूर म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. ४५० रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार १२५ रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी दोन हजार ५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. तसेच पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत.’ असे त्या म्हणाल्या होत्या.
त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावरआता विरोधकांनी तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यावर बोलताना म्हणाले कि, ‘या कॅबिनेटमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यांना रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही. मिळेत तेव्हा लाथा मारण्याचं काम राष्ट्रवादीने सुरू ठेवलं आहे. त्यांचा समन्वयाशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचा विचका करत आहे,’ अशी टीकास्त्र त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्यास यापुढे तोंड उघडले तर… याद राखा! कॉंग्रेसचा दानवेंना इशारा
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- लीड्समध्ये टीम इंडियाला विजयाची हमी ‘हे’ आहे खरे कारण
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

