Share

नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगला तोडण्यात आला आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड ३ मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे.

मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यात आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘करून दाखविले, मिलिंद नार्वेकर यांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो तोडण्याचे / पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. उद्या २३ ऑगस्ट रोजी मी दापोलीला जावून प्रत्यक्ष ह्या तोडकामाची पाहणी करणार आहे. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असेल’ असा इशाराही सोमय्या यांनी ट्विट करून दिला आहे.

दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर हा नार्वेकर यांचा हा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठा दणका मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!