Share

‘सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा…’; बिग बींची भावूक पोस्ट

Published On: 

मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये देखील शोक व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मिडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर’ असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो’,  या आशयाचे ट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

१९४४ साली ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे बॉलीवूड कारकिर्दीची सुरवात करणारे दिलीप कुमार हे बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. देवदास, मुगल-ए-आझम, राम और श्याम, गंगा जमुना यासारखे अनेक सुपरहीट चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात  दिलीप कुमार यांनी क्रांती, सौदागर, कर्मा यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या. १९९८ साली आलेला किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!