Share

अभिनेता सुयश टिळकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा

Published On: 

मुंबई : झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक प्रचंड लोकप्रियता मिळाली. याआधी अक्षया आणि सुयश या दोघांचे अफेअर होते. मात्र या दोघांनी कधीच आपले नात्याविषयी कबुली दिली नव्हती. त्यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा झाली. पण त्यानंतर त्यांचे ब्रेकअप देखील झाले. मात्र आता सुयशने त्याचा साखरपुडा उरकला असल्याचे समोर आले आहे.

https://www.instagram.com/p/CQ_vIC5hnuh/?utm_source=ig_web_copy_link

सुयश टिळकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. आयुषी भावेसह त्याचा साखरपुडा झाला आहे. आज आयुषीच्या वाढदिवसानिमित्त सुयशने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोत सुयशने दाक्षिणात्य लोकांसारखे लुंगी आणि शर्ट परिधान केला आहे आणि आयुषीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. सुयश टिळकचे फोटो पाहताच चाहते सोशल मिडीयावर त्याचे अभिनंदन करत आहेत.

https://www.instagram.com/p/CQ_vUdAJwfN/?utm_source=ig_web_copy_link

हे फोटो शेअर करत ‘ही स्त्री माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सुंदर बनवते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुषी. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी भाग्यवान माणूस आहे की मला अशी जीवनसाथी मिळाली…ही बातमी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला मला आनंद होतं आहे की, आता आमचा साखरपुडा झाला आहे. आम्ही एकत्र एक नवीन प्रवास सुरु करणार आहोत,’ असे कॅप्शन सुयशने दिले आहे.

आयुषी भावे ही देखील एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती. तर आयुषी लवकरच ‘या गावाचं की’ त्या गावाचं सिनेमात झळकणार आहे. तसेच ती सोशल मीडीयावर देखील सक्रीय असल्याचे पाहायला मिळते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!