Share

भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गज नेते-अभिनेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!