🕒 1 min read
औरंगाबाद : पानटपरीच्या काऊंटरवर दारु पिण्यास मनाई करताच दोघांनी परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना १८ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जळगाव रोडवरील गजानन कॉम्पलेक्स येथे घडली. पप्पूराम सूरज बिष्णोई (मुळ रा. लालगुरा, ता. चित्तलवाणा, जि. जालोर, राजस्थान, ह. मु. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याच्या ओळखीचा सचिन पवार व त्याचा मित्र कमलेश काळे उर्फ कोमल असे दोघे दारु पिण्यासाठी बिष्णोईच्या पानटपरीवर गेले. त्यावेळी दोघांना काऊंटरवर दारु पिण्यास बिष्णोईने मनाई केली. त्याचा राग आल्याने दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बिष्णोईच्या पोटातील आतड्या तुटल्या. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशी दारुची अवैध विक्री : दोघांवर कारवाई
देशी दारुची अवैध विक्री करणा-या दोघांना हर्सूल पोलिसांनी पकडले. ही कारवाई २० मार्च रोजी सायंकाळी करण्यात आली. तुकाराम किसन दाभाडे (४९, रा. महादेव मंदिराजवळ, हर्सूल) हा लॉकडाऊनच्या काळात हर्सूल परिसरातील शिवाणी कोल्ड्रिंक्सजवळ देशी दारुची अवैध विक्री करत होता. तसेच मुरलीधर भिमराव ताकवाले (३९, रा. चेतनानगर, म्हाडा कॉलनी, हर्सूल) हा जहांगिर कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर दारु विकत होता. त्यावरुन दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन हजार ७५६ रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा

