Share

सावधान ! कोरोना जाता जाता देऊन जातोय ‘हा’ आजार संशोधनातून समोर आली माहिती

Published On: 

मुंबई: गेल्या दिड वर्षापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोव्हीड १९ म्हणजे कोरोना आजार. या आजाराने केवळ आरोग्यावर परिणाम केला नाही तर अनेक क्षेत्रांवर कोरोनाचे भयंकर दुष्परिणाम दिसून येत आहेत. हे नुकासान आगामी अनेक वर्षात भरून निघणे कठीण आहे. याचे अनेक दुष्परिणाम अभ्यासत असताना आता नागरिकांच्या इतर अवयवांवर कोरोना काय परिणाम घडवून आणतो या संदर्भात एक अहवाल समोर आला आहे.

तुम्हाला कोरोना होऊन गेला आणि त्यातून तुम्ही सुखरूप बरे देखील झालात मात्र तुमच्या शरीरावर कोरोनाचे इतर दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना होऊन गेल्या नंतर तुमच्या शरीरात काही बदल होऊन तुम्हाला डायबेटीस होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लंडन मधील किंग्स कॉलेज आणि मोनार्श युनिवर्सिटी याबद्दल केलेल्या कोरोना रुग्णांच्या एका अभ्यासातून सामोर आले आहे.

मुळात अगोदरच डायबेटीस असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग जास्त होतो. तर या अभ्यासातून कोरोना आतड्यांवर हल्ला करतो. त्यामुळे आतड्यांची इन्शुलीन निर्माण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डायबेटीस होतो किंवा कोरोना मध्ये स्ट्रेस हार्मोन्स वाढतात त्यांचा परिनाम रक्तातल्या साखरेवर होतो. तसेच काही कोरोना रुग्णांना स्तेरोइद्स दिले जातात. त्याचा देखील परिणाम होतो. त्यामुळे कोरोना नंतर शरीरात गुंतागुंत वाढते त्यामुळे मास्क घालणे काळजी घेणे आणि कोरोना टाळणे हाच पर्याय सध्या नागरिकांच्या हातात आहे. कारण लस घेतली तरी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!